बारामती -बारामती शहर व तालुक्यात 14 संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. करोनाग्रस्तांची संख्या 236 वर पोहोचली आहे. (दि.7) घेतलेल्या 81 नमुन्यांपैकी आज आढळलेल्या करोनाग्रस्तांमध्ये शहरातील पुरुष, डोर्लेवाडी येथील महिला, प्रगतीनगर येथील महिला, जगताप मळा येथील युवक, जळोची येथील पुरुष, आमराई येथील महिला, राम गल्ली येथील एकाच कुटुंबातील पूर्वीच्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तिघेजण आहेत.
यामध्ये महिला, पुरुष व नऊ महिन्याची मुलगी, तसेच शहरातील पुरुषास लागण झाली आहे. काल रात्री निंबूत येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण व माळवाडी लोणी येथे मुंबईवरून आलेला एक रुग्ण असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. माळेगाव येथील एकाचा अहवाल खासगी प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.