बारामतीकर चिंतेत, आज नवीन १५ रुग्णांची भर

बारामती (प्रतिनिधी)- बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून आज नवीन १५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. एकूण संख्या २५१ एवढी झाली आहे. तसेच, शहरातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.

दि (८) रोजी १०१ संशयित नमुन्यांमध्ये १५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यातील ७७ जण निगेटिव्ह आढळले आहेत तर ९ अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. बाधित रुग्णांना पैकी २ जण ग्रामीण भागातील व १३ जण शहरातील आहेत. आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या २५१ झाली असून काल रात्री शहरातील अत्यवस्थ कोरोना ग्रस्त रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शहरातील विवेकानंद नगर येथील तीस वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील खजूर रुग्णाच्या संपर्कातील एक २९ वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दहा वर्षाचा मुलगा, वसंतनगर येथील चाळीस वर्षे पुरुष व तीस वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील ५८ वर्षीय महिला, मुजावरवाडा येथील ४७ वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील पुरुष, ढेकळवाडी येथील खताळपट्टा येथील ३८वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील साठ वर्षीय पुरूष, भोई गल्ली येथील ६५ वर्षीय महिला व ४०वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील ११ वर्षीय मुलगा व ७० वर्षीय पुरुष व इंदापूर रोड येथील ३५ वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.