अभिनेत्री निवेदिता सराफ करोना पॉझिटिव्ह

मुंबई – मिशन बिगेन अंतर्गत राज्यात काही निर्बंध लागू करत चित्रिकरणास परवानगी दिल्यानंतर आता मालिकांच्या सेटवरही करोना संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. झी मराठीच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत त्या मुख्य भूमिका साकारत आहेत.

निवेदिता सराफ यांना करोना विषाणूची सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून करोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु करण्यात आले आहेत.

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत निवेदिता सराफ या आसावरी राजेची भूमिका साकारतात. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. तर आसावरीच्या व्यक्तिरेखेलाही लोकप्रियता मिळाली आहे. 

या मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली आहे. या सगळ्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.