जगातील प्रभावशाली व्यक्‍तींमध्ये नरेंद्र मोदी

टाईमची यादी जाहीर; आयुष्मानसह 5 भारतीयांचा समोवश

नवी दिल्ली – टाईम मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्‍तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुराणासह पाच भारतीयांनी स्थान मिळवले आहे.

सोबतच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, लंडनमधील एचआयव्हीवर संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्‍टर रवींद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या बिल्किस दादीचे नाव देखील या यादीत आहे. हे सर्व जण या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.

टाईम मॅगझिनने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी लिहिले की, लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकाच सर्वात आवश्‍यक नाहीत. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे, ज्यांनी विजेत्याला मत दिले नाही. भारत गेल्या सात दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

सोबतच अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन, अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचीही नावे आहेत. तसेच या यादीत अमेरिकन शास्त्रज्ञ अँथनी फॉसी यांचेही नाव आहे.

या यादीत आयुष्मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता आहे, जो जगातील सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत आला आहे. यावर आयुष्मान म्हणाला की, टाईम्स मॅगझिनकडून घोषित केलेल्या या यादीत नाव आल्याने मोठा सन्मान मिळाल्यासारखे वाटत आहे. यावर त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.