मुंबई – अभिनेत्री काजोल आणि देवगण यांची मुलगी न्यासा देवगण बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत असते. अगदी लहान असल्यापासून स्टार किड्समध्ये न्यासा चांगलीच प्रसिद्ध आहे. नुकतीच ती बॉलिवूड दिवाळी पार्टीमध्ये एकदम हॉट अंदाजात दिसली होती. तेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत जोरदार चर्चा सुरु होती. आता काजोलने स्वतः लेकीच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत खुलासा केला आहे.
काजोल म्हणते की न्यासाला ब्युटी आणि हेल्थविषयी सर्व काही माहित आहे.न्यासा आठवड्यातून तीनदा फेस मास्क लावते तसेच ती तिचे वडील अजय देवगण सारखी फिटनेस फ्रीक असल्याचे काजोल सांगते. न्यासा जिमपेक्षा योगावर जास्त भर देते तसेच ती सकाळी उठून रिकाम्या पोटी २ ते ३ ग्लास कोमट पाणी पिते. यासोबत ती फ्रुट आणि उकडलेली अंडी खाते. दुपारच्या जेवणात साध्य हिराव्या पालेभाज्यासह रोटीचा आहार घेत असल्याचे काजोलने यावेळी सांगितले.
न्यासा ही लोकप्रिय स्टार किड्समध्ये एक आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतच तिने १९ वा वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अजय देवगणने सांगितले होते की, तिने हे करावे की नाही हे तो आपल्या मुलांना कधीही सांगणार नाही. त्यांना जे करायचे ते ते करू शकतात.