९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री स्टायलिश दिसते सध्या सोशलवर काजोलच्या मोबाईल वालपेपरची चर्चा चांगलीच रंगली आहे.
सोशलवर काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिच्या फोनच्या वॉलपेपरची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. काजोलच्या मोबाईल वॉलपेपरवर अजय देवगणचा फोटो नसून लाडकी लेक न्यासाचा फोटो दिसून येत आहे. व्हायरल होणाऱ्या विडिओत काजोल लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. या पापराझींनी काजोलच्या मोबाईलकडे कॅमेरानेत हा व्हिडीओ शूट केला आहे. यात काजोलच्या वॉलपेपरवर न्यासाच्या फोटो दिसून येत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओवर चाहतेही संमिश्र प्रतिक्रिया देत आहे. अनेकांना असंच वाटत असेल की तिच्या फोनच्या वॉलपेपरवर नक्कीच अजय देवगणचा फोटो असेल परंतु तसं नाहीये. तिने आपल्या वॉलपेपरवर खास व्यक्तीचा फोटो ठेवला आहे आणि ती व्यक्ती आहे निसा देवगण. म्हणजे काजोल आणि अजय देवगणची लाडकी लेक. निसा देवगणचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. सध्या हा व्हिडीओ इंस्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे.
काजोलच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तिचे अनेक हिंदी चित्रपट हे गाजले आहेत. त्याचसोबत आता तिनं ओटीटीवरही पदार्पण केले आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘द ट्रायल’, ‘त्रिभंगा’ अशा काही चित्रपट, वेबमालिकांतून तिनं कामं केली आहेत. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.