भोर तालुक्यातील भोलावडे ग्रामपंचायत मध्ये एक दिवसाचे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले . जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता पंधरवडा अभियानाच्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत गावांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम घेण्यात आली.
बोलावडे गावात या मोहिमेचा शुभारंभ ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या मंदिर परिसरापासून व ग्रामपंचायत समोर स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली . तब्बल चार तासात गावठाण , हरिजन वस्ती , जिल्हा परिषद शाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली . ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानामध्ये तरुणांची संख्या मोठी होती.
स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन स्वतः तरुणांनी हातात झाडू घेतला . त्यांच्यासोबत नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या उत्साहात स्वच्छतेचे महत्व आपल्या कृतीतून ग्रामस्थांना दाखवून दिले . याप्रसंगी सरपंच प्रवीण जगदाळे ,उपसरपंच गणेश आवाळे , माजी सरपंच शशिकांत जगदाळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पडवळ , बंडा तारू , मनोज मोरे , अविनाश आवळे , ग्रामसेवक निळकंठ निकाळजे , सामाजिक कार्यकर्ते सुनील चोरगे, मंगेश आवळे , नरेंद्र जगदाळे , दत्ता अबदागिरे , धनंजय आवळे , रवींद्र जगदाळे , दिलीप आवळे , नामदेव गुरव , आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर , सदस्य मयूर मस्के , बबन आवळे , दत्ता आवळे , किरण कांबळे , निलेश गावडे , रणजीत रणखांबे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .