मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. नुकतेच त्यांनी ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ‘वेड’ नंतर आता जिनिलिया ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेता मानव कौल आणि जिनिलिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाबाबत जिनिलिया म्हणते की, “ही कथा एका अविवाहित आईबद्दल आहे जिला तिचे खरे प्रेम सापडते, जे सामान्य महाविद्यालयीन प्रेमकथेपेक्षा वेगळे आहे आणि मी त्याचा एक भाग होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे. ट्रायल पीरियड टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला विश्वास आहे की आमच्या प्रामाणिक कामाची नक्कीच प्रशंसा होईल. मी जिओवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.”
दरम्यान, ट्रायल पीरियड चित्रपटाची कथा एका मुलाच्या निरागस मागणीभोवती फिरणारी आहे. जो आपल्या आईकडे वडिलांची इच्छा व्यक्त करते. चित्रपटात जिनिलिया सिंगल मदर ‘एना’ची भूमिका साकारत आहे आणि मानवने 30 दिवसांसाठी वडील म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीची भूमिका बजावली आहे. आलिया सेन यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जेनेलिया देशमुख, मानव कौल मुख्य भूमिकेत असून शक्ती कपूर, शीबाचड्डा, गजराजराव आणि झिदान ब्राझ हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जुलैला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.