मुंबई – बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत शाहिद आणि मीरा यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री नेहमीप्रमाणेच खास आहे. या जोडप्याची बॉन्डिंग आणि केमिस्ट्री इतकी मजबूत आहे की दोघांनी अरेंज मॅरेज केले आहे असे कोणी म्हणणार नाही. कपलने त्यांच्या संबंधित इंस्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे जी पाहता पाहता व्हायरल होत आहे.
शाहिद कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीसोबतच्या सुट्टीतील एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कपल लिप लॉक करताना दिसत आहे. शाहिद शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे, तर मीरा पांढर्या टॉपसह काळ्या जीन्समध्ये दिसत आहे.
मीरा राजपूतनेही सोशल मीडियावर पती शाहिद कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने समुद्रकिना-यावरून शाहिदसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये हे दोघेही लीप लॉक करताना दिसत आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या वयात १३ वर्षांचे अंतर आहे. असे असूनही त्यांच्यात अपार प्रेम आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मीशा आणि मुलाचे नाव जैन आहे. मीरा फिल्मी जगापासून दूर असली तरी फॅशन इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने अनेकवेळा रॅम्प वॉकच्या लूकने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.