मुंबई – ‘खतरों के खिलाडी’ चे सध्या 13 वे पर्व सुरू झाले आहे. या कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम सहभागी झाली आहे. याशिवाय हिंदी टेलिव्हिजनमधील अनेक आघाडीचे कलाकार देखील यात सहभागी झाले आहेत. मात्र ‘खतरों के खिलाडी’ शोच्या शूटिंगदरम्यान अर्चना गौतम हिला चेहऱ्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या मालिकेतचे शूटिंग आफ्रिकेतील केपटाऊन येथे सुरू असून एका स्टंटदरम्यान तिला दुखापत झाली आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अर्चनाला दुखापत झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका टास्क दरम्यान अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे तिच्या चेहऱ्याला काही टाकेही घालण्यात आले आहे. याशिवाय तिच्या गुडघ्यांना देखील मार लागल्याचे दिसते. अर्चनाला दुखापत झाल्याचं कळताच तिचे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. अर्चनाच्या आधी अनेकांना स्टंट करताना दुखापत झाली आहे. यात रोहित रॉय, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी आणि अंजुम फकीह यांचाही समावेश आहे.
बिग बॉसमधून अर्चनाने बिनधास्त स्वभावामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्चना गौतम बिग बॉस 16 पासून खूप लोकप्रिय झाली आहे. या शोमुळे तिला रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये एंट्री मिळाला. खतरों के खिलाडी 13 मध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात भांडण झाल्याची चर्चा देखील रंगली होती.
Wrinkles mean you laughed,
Grey hair means you cared, and
Scar mean you played in KKK.Hope it’s not painful for Archana and angare wishes her a speedy recovery. Take care Archu.#ArchanaGautam #ArchanaKeAngare @archanagautamm #kkk13withArchana #khatronkekhiladi13 pic.twitter.com/qqgkeSgyX2
— Team Archana Gautam Official FC 🌟 (@team_ArchanaFC) June 12, 2023
‘खतरो के खिलाडी’ 13च्या पर्वामध्ये शिव ठाकरे, रोहित रॉय, अंजली आनंद, डेझी शाह, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, अंजुम फकीह, अरिजित तनेजा, रुही चतुर्वेदी, नायरा बॅनर्जी, शीझान खान हे कलाकार सहभागी आहेत.