मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण मागील अनेक दिवसांपासून गाजत आहे. यात आता मोठी घडामोड झाली आहे. सुशांतला ड्रग्स पुरवणाऱ्या पेडलरला एनसीबीने अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
समीर वानखेडे यांनी सांगितले की, एनसीबीने गोवा येथून मादक पदार्थांची खरेदी करणार्या तीन लोकांना अटक केली आहे, त्यापैकी एक अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स पुरवठा करत होता. यापूर्वी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असून, तेथून बरेच ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत.
Officers of NCB Mumbai are conducting raids on some places in Goa. A huge amount of drugs have been recovered and some drug peddlers have been taken into custody: NCB officer
— ANI (@ANI) March 7, 2021
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने कोर्टात 12,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, एनसीबीने हे आरोपपत्र 33 लोकांविरोधात दाखल केले आहे. हे सर्व लोक सुशांतला ड्रग्ज पुरवठा आणि खरेदी, तसेच इलिसिट फायनान्सशी थेट जोडलेले आहेत.