Entertainment – अभिनेता इमरान हाश्मीने गेल्या वर्षी कमबॅक केले. तो सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसला. काही दिवसांपूर्वी इमरान हाश्मी टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला होता.
यावेळी तो ‘डॉन 3’ मध्ये दिसणार असा अंदाज चाहते बांधू लागले आहे. जेव्हा इमरान हाश्मी त्याच्या नवीन रोल्स रॉयसमध्ये जाताना दिसला तेव्हा पापाराझींनी त्याला ‘डॉन 3’ असं म्हणत हाक दिली.
जेव्हापासून निर्मात्यांनी ‘डॉन 3′ मध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगला कास्ट करण्याची घोषणा केली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले होते,’नवीन युगाची सुरुवात. #Don3’
इमरान हाश्मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात रणवीर मुख्य नायक असून, आता मुख्य नायिकेचा कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात सुपरहॉट प्रियांका चोप्रा ‘डॉन 3’चा भाग बनू शकते, असे बोलले जात आहे. प्रियांका ‘डॉन’ फ्रेंचायझीच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांचा भाग होती.
रिपोर्टनुसार, फरहान अख्तर ‘डॉन 3’ चित्रपटाच्या कास्टिंगवर गेल्या कित्येक दिवसांपासून लक्ष देत आहे. अशात ती लवकरच प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंगसोबत ‘डॉन 3’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अशी चर्चा सध्या रंगली आहे. प्रियांकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली, यावेळी ‘डॉन 3’ बद्दल चर्चा करण्यात आली.