नवी दिल्ली – बॉलीवूडसह मनोरंजनसृष्टीला काही दिवसांपासून धक्का देणाऱ्या गोष्टी घडत आहे. यामध्ये अनेक नावाजलेल्या कलाकारांनी जगाचा निरोप घेत सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आता बॉलिवूडचे दिग्दर्शक-अभिनेते आमिर रजा हुसैन यांनी अचानक एक्झिट घेतली आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी शनिवारी मध्यरात्री दिल्लीतील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते आमिर रजा हुसैन यांचा जन्म 6 जानेवारी 1957मध्ये कुलीन अवधी कुटुंबात झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या लहानपणातच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे एकट्या आईने त्यांचा सांभाळ केला होता. हुसैन यांनी मेयो कॉलेज अजमेर येथून आपले शैक्षणिक शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत थियेटरमध्ये काम केलं होतं.
अलीकडच्या रिलीज झालेल्या “बाहुबली’, “आरआरआर’ आणि आगामी “आदिपुरुष’ या चित्रपटांच्या आधीच आमिर रजा हुसैन यांच्या क्रिएटिव्ह बुद्धीने लोकांना ‘”द फिफ्टी डेड वोर’च्या माध्यमातून मेगा थियेटर प्रोडक्शनचा अनुभव घेण्याची संधी दिली होती. या चित्रपटाने सर्वानांच थक्क केले होते.
या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी कारगिल युद्धाची अशी मांडणी केली होती की, आजही प्रेक्षकांना प्रत्येक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आमिर रजा हुसैन यांनी आपले संपूर्ण आयुष्य थियेटरमध्ये अभिनय करण्यात वेचले आहे. ते एक दमदार अभिनेता तर होतेच शिवाय ते एक उत्तम दिग्दर्शक होते.