चेन्नई – दक्षिणात्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तामिळनाडूतील माजी मंत्र्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच पीडित अभिनेत्रीने काही फोटो पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केले आहेत.
याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून या घटनेचा तपास सुरू आहे. संबंधित पीडितेने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉ. मणिकंदन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही वर्षांपासून डॉ. मणिकंदन यांच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचा आरोपही पीडित अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री मुळ मलेशिया या देशाची असून मागील काही वर्षांपासून ती तमिळ चित्रपटसृष्टीत काम करते.
दरम्यान मणिकंदन यांच्या प्रेमसंबंधातून पीडित अभिनेत्री गर्भवती झाली असता, तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्याच बरोबर घटनेची केली, तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही मणिकंदन यांनी दिली असल्याचं अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पीडित अभिनेत्री 2017 मध्ये पहिल्यांदा मणिकंदन यांना भेटली होती. तेव्हापासूनच दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. पण अभिनेत्रीनं लग्नाबाबत विचारलं तेव्हा मणिकंदन यांनी लग्न करण्यास नकार दिला, असंही तक्रारीत म्हटलं आहे.