पुणे – मार्केटयार्ड येथील विद्यासारग कॉलनीतील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी जुगाराचा अड्डा उध्वस्त केला. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील दोन माजी नगरसेवक, काही ठेकेदार आणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. या करोनाचे प्रतिबंध लागू असताना उघडकीस आलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालु असल्याची खबर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यांनी मार्केटयार्डच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना खातरजमा करण्यास सांगितले होते. त्यानूसार अनघा देशपांडे पथकासह गेल्या असता त्यांना विपुल बंगला नावाच्या बंगल्याला बाहेरुन कुलुप लावलेले दिसले.परंतू बंगल्याचे खिडकी मधुन आत पाहिले असता आतमध्ये नागरिक जुगार खेळत असल्याचे दिसुन आले.
त्यावेळी त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सांगितले की,आम्ही इसम हर्षल पारेख ( बंगल्याचा मालक) याचे सांगणेवरुन जुगार खेळण्यासाठी आलो आहे. आम्ही बंगल्याचे आतमध्ये जुगार खेळत असतांना आम्हाला हर्षल पारेख याने”मी तुम्हाला जेवण आणुन देतो असे सांगुन तो बंगल्याला बाहेरुन कुलुप लावुन गेला आहे.
घराबाहेर पोलीस आल्याची खबर मिळताच पारेख कुलूप उघड्यासाठी आला नाही. तसेच आतील लोकांनीही मागच्या दरवाजाची कडी उघडली नाही. यामुळे रात्रीच्या वेळी तोडफोड करुन इतर रहिवाशांना त्रास नको म्हणून पोलीस सकाळपर्ययत बंगल्याबाहेरच थांबले होते.
पोलिसांनी सकाळी 10.45 वाजता कुलूप तोडून छापा टाकला. त्या ठिकाणी एकुण 19 पुरुष आरोपी मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन 53 हजार 900 रुपये रोख रक्कम,तसेच एक लाख रु किंमतीच्या 4 मोटारसायकल असा एकुण 1 लाख 53 हजार रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य मिळुन आले.
हे कोरोना संसर्गाचे काळात संचारबंदी आदेशाचे उल्लघन करुन विना मास्क जुगार खेळतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेवर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानूसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयक्त अमिताभ गुप्ता, सह.पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप
आयुक्त नम्रता पाटील,सहा.पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक संतोष शिंदे,पोउपनिरी अमोल कदम, पोउप निरीक्षक चेतन भोसले, पो.हवा.गोविंद गोरडे, निषाद कोंडे, पो.ना.प्रशांत धोत्रे, वामन पडळकर , पो.शि.अमोल दबडे, श्रीशैल कोळी, प्रशांत मुसळे, सुनील पोळेकर, भिमराव कांबळे,अनीस शेख, स्वप्नील कदम, पांडुरंग भिलारे, राहुल औंधकर, बाळासाहेब गालफाडे, प्रमोद काटकर, अनिरुध्द आनेराव, प्रवीण धालपे,वैभव बधे, मकसुद तांबोळी, रोहित कणसे, आशिष यादव यांच्या पथकाने केली.