अभिनय आणि कलेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याचे आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. आयुष्मानने चंदीगढजवळ एक आलिशान घर खरेदी केले आहे.
आयुष्मान खुरानाने पंचकुला सेक्टर 6मध्ये हे घर खरेदी केले आहे. आयुष्मान पत्नी ताहिरा कश्यपबरोबर या घरासाठी सेल डील पूर्ण केले आहे. आयुष्मानने हे घर तब्बल 9 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. हे घर त्यांनी उद्योगपती सुभाष बिंद्रा आणि विणा बिंद्रा यांच्याकडून खरेदी केले आहे. विशेष म्हणजे आयुष्मानचे वडील वीरेंद्र खुराना हे देखील पंचकुला याठिकाणीच राहतात.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आयुष्मान खुरानाने चंदीगढमध्ये एका जाहिरातीचे शूट करत सेटवर वापसी केली आहे. दरम्यान, लॉकडाउनममध्ये शूजीत सरकार यांच्या “गुलाबो सिताबो’मध्ये झळकला होता. हा चित्रपट ऑनलाईन रिलीज करण्यात आला होता. यात आयुष्मानसोबत अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला होता.
View this post on Instagram
My silver lining. 🖤 Borrowed a part of your caption. Ahem. @tahirakashyap #gqmenoftheyearawards2019