राजगुरूनगर -खेड बाजार समितीतील भाजीपाल्याचा आडतदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा संपर्कात आलेले आडतदार, बाजार समितीमधील कर्मचारी, व्यापारी व शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यात 24 तासांत तब्बल 30 जण पॉझिटिव्ह सापडल्याने करोनाचा धोका वाढत चालला आहे.
गेल्या 24 तासांत आळंदी 5, राजगुरूनगर 7, रासे 1, चाकण 1, नाणेकरवाडी 1, खालुंब्रे 2, भोसे 1, वाकी बद्रुक 1, रोहकल 1, बिरदवडी 1, चिंबळी 1, कुरूळी 1, दावडी 2, खराबवाडी 5, असे 30 जण पॉझिटिव्ह
सापडल्या आहेत. त्यामुळे खेड अजूनही भयभीत आहे.