उज्जेैन – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, इंदूर कसोटी सामन्यात मोठा पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत शनिवारी सकाळी बाबा महाकालेश्वच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला.
यावेळी त्यांनी महाकाल मंदिरात देवाच्या दर्शनासोबतच आरतीही केली. विराट कोहली पारंपारिक पोशाखात दिसला तर पत्नी अनुष्काही पारंपारिक पोशाखात दिसली. अनुष्का-विराटने यावेळी मंदिरात बराच वेळ घालवला, तर यावेळी पुजारीही कोहलीला काहीतरी समजावताना दिसले.
#WATCH | Madhya Pradesh: Actor Anushka Sharma & Cricketer Virat Kohli visit Mahakaleshwar temple in Ujjain. pic.twitter.com/NKl8etcVGR
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 4, 2023
त्याचवेळी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अनुष्का शर्माने आम्ही येथे देवाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो, येथे खूप छान वाटले, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. याआधी 2023 च्या सुरुवातीला विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत वृंदावन येथील बाबा नीम करोली यांच्या आश्रमात देखील हजेरी लावली होती.