नगर -करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात संचार बंदी असतांना नागरिक विनाकारन रस्त्यवर फिरत असल्याने पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत कारवाईचा बडगा उगारला आहे. नगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली.
तसेच शहरात शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याहद्दीत विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरात डीएसपी चौक, प्रोफेसर चौक, चितळेरोड, पत्रकार चौक, भिस्तबाग चौक, बालिकाश्रम रस्त्यावर कारवाई करण्यात आली.