नगर -राज्यातील विविध भागातील तरुण-तरुणी हे गुजरात मधील वडोदरा शहरात खासगी कंपन्या व कॉलसेन्टर मध्ये काम करत आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कंपन्याचे काम संपूर्ण पणे बंद पडले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तेथेच घरी थांबावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. युवकांनी मंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना तत्काळ महात्मा फाऊंडेशनच्या पुढाकारातून मदत करण्यात आली आहे.
ना.बच्चू कडू यांनीप्रहार संघटनेचे महाराष्ट्र सचिव गणेश पुरोहित यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी महात्मा फाऊडेशनचे अध्यक्ष शेखर व्यवहारे यांच्याशी संपर्क साधून गुजराथमधील युवकांना मदत करण्यास सांगितले. त्यानुसार शेखर व्यवहारे यांनी गुजरात मधील आपले सहकारी प्रा. संजय बच्छाव यांना युवकांची अडचण कळविली. प्रा. संजय बच्छाव यांनी आपले मित्रांच्या सहकार्याने या तरुणांना पुढील 1 महिना लागणारे जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देऊन, तरुणांना लॉकडाऊन संपेपर्यंत सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले.