पिंपळे गुरव (वार्ताहर) – पिंपरी – चिंचवड शहरात करोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे. महापालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना प्रत्येक प्रभागनिहाय भाजी मार्केट आणि ग्राहक आणि विक्रते यांच्याकरीत नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करून विक्री करण्याची परवानगी दिली. तरीही अनेक भाजी विक्रेते नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
काही विक्रेत्यांवर शनिवारी (दि.16) वाकड, सांगवी पोलीस ठाणे हद्द काळेवाडी, रहाटणी फाटा, रहाटणी गावठाण, सृष्टी चौक, पवनानगर, साठ फुटी रस्ता, रामकृष्ण मंगल कार्यालय, कृष्णा चौक, क्रांती चौक, फेमस चौक, व परिसरात विनापास हातगाडी व पथारी व्यावसायिक फळे आणि भाजीपाला विक्रेते यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन हातगाडी भाजीपाला, फळे व अन्य साहित्य जप्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या कारवाईत 16 हातगाडी, 2 टेम्पो, चार इलक्ट्रिक वजन काटे. तसेच 1 फूल ट्रक जप्त केलेला भाजीपाला व फळ ही मासुळकर कॉलनी येथील इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन येथे जमा करणेत आले आहे.