पुणे : शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कडक निर्बंध जारी केले आहेत. संचारबंदीचे आदेश, मास्कचा वापर न केल्याप्रकरणी साडेचारशे जणांवर कारवाई केली. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली आहे.
नाकाबंदीच्या ठिकाणी 261 पोलीस अधिकारी तसेच 1627 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात पोलिसांनी संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई तीव्र केली आहे. परवानगी न घेता संचार केल्याप्रकरणी 288 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 185 वाहने जप्त केली आहेत. मास्कचा वापर न केल्याप्रकरणी 58 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.