एकाच गावात आढळले ८ करोनाबधित; कोपरगाव तालुक्यात खळबळ

कोपरगाव : कोपरगाव तालुका गेल्या अनेक महीन्यापासून कोरोना संसर्गजन्य आजारापासुन काहीसा सुरक्षीत असताना गुरूवारी अचानक एकाच गावातील एकाच कुटुंबाच्या संपर्कातील तब्बल ८ जनांना कोरोना विषाणुजन्य संसर्गाची लागन झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर परीसरातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती त्याच्या संपर्कातील एका डॉक्टरासह १६ लोकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्या डॉक्टरासह त्याच्या कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची लागण झालाचा वैद्यकीय अहवाल गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची  संख्या सध्या १० झाली आहे.

दरम्यान रविवारी तालुक्यातुन २२ जनानांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांच्या घश्याचे स्त्राव पाठविले होते पैकी सुरेगाव मोतीनगरच्या एकाच कुटूंबातील नातलग बाधीत निघाले. त्यात दोन अल्पवयीन मुली, ३ अल्पवयीन मुलं, २ महीला , १ पुरुष असुन सुरेगाव परिसरात प्रसिध्द असलेल्या एका डॉक्टराचा सामावेश असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात करोना बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यात अधिक आहे अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली आहे.
दरम्यान तालुक्यातील संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा या बाधीत रुग्ण संख्येमुळे खडबडून जागी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.