पुणे – हडपसर परिसरामाध्ये खून केल्याप्रकरणी (murder case) अटकेत असलेला सराईत तीन वर्षांनी तुरूंगाबाहेर ( jail) आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती माधव जमादार यांनी जामीन मंजुर झाला आहे. अमोल बबन रजपूत असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड निरंजन भावके, ॲड प्रणित नामदे , ॲड अजित पवार यांचे मार्फेत जामिनासाठी अर्ज केला आहे.
हडपसर पोलिसांनी त्याला ७ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली होती. त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपी सराईत आहे. त्याच्यावर पूर्वीचे एकूण २१ गुन्हे दाखल आहेत. तो २ वर्ष तडीपार देखील होता. त्याच्याकडुन रक्ताचे डाग असलेले कपडे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. गुन्हा करतेवेळी सीसीटीव्ही मध्ये देखील दिसत असल्याचे सरकारी वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आलेले होते.
यावर ॲड. निरंजन भावके, ॲड प्रणित नामदे,ॲड अजित पवार यांनी युक्तिवाद केला की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अफरातफरी केल्याचे दिसून येत आहे. मयताला मारण्याचा आरोपीचा कोणताही हेतू दिसून येत नाही. पूर्वीच्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यामध्ये आरोपाची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर काहीमध्ये जामीन आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस २५ हजाराच्या जातमुजल्यावर जामीन मंजुर केला.