हिवरे झरे येथील युवकाचा अपघाती मृत्यू

नगर  – नगर – दौंड महामार्गावरील हिवरे झरे गावाजवळ सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात संदीप रावसाहेब टकले (वय 27, रा. हिवरे झरे) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.

संदीप रावसाहेब टकले हा आपल्या मोटारसायकलवरून कोळगावकडे जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यास धडक दिली. या धडकेने तो सुमारे 20 ते 25 फूट लांब उडून पडला. गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कार चालक कार तेथेच सोडून नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)