ईव्हीएम प्रकरण : काँग्रेस नेत्याची सर्वोच्च न्यायालयावर वादग्रस्त टीका 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. परंतु, त्याआधी विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून रान उठविले आहे. आता या वादात एका काँग्रेस नेत्याने सर्वोच्च न्यायालयालाही खेचले आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

उदित राज म्हणाले कि, व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठ्यांची पडताळणी व्हावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? तेही या गडबडीत सामील आहेत का? निवडणूक प्रक्रियेत तीन महिन्यांपासून सर्व सरकारी कामे मंद पडली असतील तर मोजण्यासाठी दोन-तीन दिवस लागले तर काय फरक पडतो? असे त्यांनी म्हंटले आहे.

निवडणूक आयोगावर गंभीर टीका करताना उदित राज म्हणाले, भाजपला ज्या-ज्या ठिकाणी ईव्हीएम बदलायची होती. त्या ठिकाणी बदललीही असेल. यासाठीच निवडणूक सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. ओरडून कोणीही तुमचे ऐकणार नाही. लिहून काही होणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. देशाला जर या इंग्रजांच्या गुलामांपासून वाचवायचे असेल तर आंदोलन करायला लागेल. साहेब, निवडणूक आयोगही विकले गेले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान “व्हीव्हीपॅट’च्या स्लीपांबरोबर 100 टक्के पडताळणी करण्यात यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.