धुळ्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात

7 जागीच ठार 19 जण गंभीर जखमी

धुळे : मध्य प्रदेशातील ऊसतोड मजूर घेऊन उस्मानाबादला येणाऱ्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले आहेत तर 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये 2 महिला 5 मुलांचा सहभाग आहे. या पिकअप व्हॅनमध्ये सुमारे 51 मजूर प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे. हा अपघात रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास धुळ्यातील विंचूर गावाजवळ घडला. सर्व मजूर झोपेत असतानाचा काळाने त्यांच्यावर घाला घातला.

धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात झाला. पुल अरुंद आणि त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाला. पुलावरून हे वाहन थेट नदीपात्रात कोसळला. स्थानिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वाहन नदीतील पाण्यात कोसळल्याने बचावकार्य कठीण झाले होते. स्थानिकांनी 20 ते 25 जणांना पाण्यातून बाहेर काढले. यांपैकी 7 जण मृत पावले होते. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना धुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.