कॅनडाचे पाहुणे आले बैलगाडीत

हिवरे गावात स्वागत; ११५० विद्यार्थ्यांना स्लिपिंग किट

सासवड – हिवरे गावात कॅनडा वरून आलेल्या पाहुण्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपरिक नृत्य तसेच लेझीम खेळाने पाहुण्यांचे मन जिंकले. गावात भारत आणि कॅनडाचेही राष्ट्रगीत लावण्यात आल्यानंतर जग एकवटल्याची भावना निर्माण झाली होती. तर, भारतीय परंपरेनुसार सरस्वती पूजन, दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानेही परदेशी पाहुणे भारावून गेले. या उत्साहाचे निमित्त होते… “स्लिपिंग किट’चे वाटपाचे.

पुरंदर तालुक्‍यातील विविध प्राथमिक विद्यालयातील सुमारे ११५० विद्यार्थ्यांना स्लिपिंग किटचे वाटप आज करण्यात आले. हिवरे गावातील विद्यालयात हा कार्यक्रम झाला. कॅनडा मधील स्लिपिंग चिल्ड्रेन राऊंड द वर्ल्ड म्हणजेच स्कॉ संस्था तसेच पुणे व पुरंदर रोटरी क्‍लब यांच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध 36 वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे. एका किटची किंमत पाच हजार
रूपये आहे.

कॅनडातील स्कॉ ही संस्था 1974 पासून विकसनशील देशांमधील विद्यार्थ्यांना स्लिपिंग किट देण्याचे काम करीत असून आतापर्यंत सुमारे 14 लाख गरजू विद्यार्थ्यांना या संस्थेने किट दिली आहेत. यामध्ये शालेपयोगी साहित्यासह ड्रेस, चादर, मच्छरदाणी, चटई अशा विविध 36 वस्तूंचा समावेश आहे. स्कॉ संस्थेचे डायना बॅरीक, फ्रान विल्सन, के माउंटफोर्ड, आर्ची दि गॉर्ड, किन्डे हॉलमन, अँन्ड्रीया तायनान हे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, भारती हॉस्पीटलच्या प्रमुख डॉ. अस्मिता जगताप, गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे, पुरंदर रोटरीचे अध्यक्ष ऍड. युवराज वारघडे, पुणे कॅन्टोन्मेंट रोटरीचे अध्यक्ष सर्फराज पोटीया, पुणे मेट्रो रोटरीचे अध्यक्ष मुकुंद चिपळूणकर, शनिवारवाडा रोटरीचे अध्यक्ष अनिता पाटील, पंकज आपटे, समीर रूपानी, किरण कुलकर्णी तसेच प्रदीप पोमण, हिवरेचे सरपंच संदिप लिंभोरे, एम.के. गायकवाड, शब्बीर शेख, अशोक दळवी, अनिता कुदळे, भारती गायकवाड, मल्हारी दळवी, चंद्रकांत गायकवाड, धर्माजी गायकवाड, शंकर कुदळे, मुख्याध्यापिका सुनिता रायडू, विविध शाळांतील शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

स्व. चंदूकाका जगताप यांनी पुरंदर रोटरीची स्थापना केली, त्यांनी घालून दिलेल्या सामाजिक कामांच्या आदर्शाप्रमाणे पुरंदर रोटरीचे काम सुरू असल्याचे अध्यक्ष युवराज वारघडे यांनी सांगितले. रोटरीयन अनिल उरवणे, अभिजित बारवकर, डॉ. प्रविण जगताप, गुलाब गायकवाड, ऍड. आनंद जगताप, डॉ. विनायक बांदेकर, चंद्रकांत हिवरकर यांनी संयोजन केले. समन्वयक वैभव पोरे यांनी सुत्रसंचलन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.