उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर आज पहाटे 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले आहेत. बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर जेवार टोल प्लाझाच्या अलिकडे 40 किमीच्या परिघात हा अपघात झाला आहे.
बोलेरो गाडीत एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जात होते. बोलेरो गाडी जेवर टोल प्लाझापासून काही अंतरावर होती त्याच वेळी भारधाव गाडी समोरील डंपरला पाठीमागून जोरदार धडकली. गाडी इतकी वेगाने होती की, बोलेरो गाडी थेट डंबरच्या पाठीमागील भागात शिरली. या अपगातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर यातील 5 जणांना मृत घोषित करण्यात आले. सध्या अन्य दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील निवासी आहेत.
चंद्रकांत नारायण बुराडे (वय 68 वर्षे) – बारामती, पुणे, स्वर्णा चंद्रकांत बुराडे (वय 59 वर्षे) – बारामती, पुणे, मालन विश्वनाथ कुंभार (वय 68 वर्षे) – बारामती, पुणे, रंजना भरत पवार (वय 60 वर्षे) मराठा नगर, बारामती, पुणे, नुवंजन मुजावर (वय 53 वर्षे) बेळगाव, चिकोडी कर्नाटक असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर, नारायण रामचंद्र कोळेकर (वय 40 वर्षे) फलटण, सातारा व सुनीता राजू गस्ते (वय 35 वर्षे) बेळगाव जखमींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.