मुंबई – समृद्धी महामार्गावर तळेगाव येथे ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. दुर्घटनेत मृत्यू पावलेले व्यक्ती समृद्धी महामार्गचे काम करणारे मजूर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर समृद्धी महामार्गाच्या कामावर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला. अपघातात मृत्यू पावलेले मजूर समृद्धी महामार्गावर काम करणारे असून ते परप्रांतीय असल्याची माहिती आहे. अपघातात 12 जणांचा मृत्यू तर इतर काही मजूर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे त्याच दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.