नवी दिल्ली – ऑनलाईन खरेदीसाठी सर्वात विश्वासू कंपनी म्हणून अॅमेझॉनकडे पाहिलं जातं. विविध सेलच्या माध्यमातून अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देताना दिसते. अनेक वस्तुंवर मोठ्या प्रणामात सूट मिळते. आता अॅमेझॉनची एक सीक्रेट वेबसाईट आहे जिथं आपल्याला ५० टक्क्यांहून अधिक सूट मिळते.
अॅमेझॉनची ही सीक्रेट वेबसाईट अनेकांना ठावूक नाही. अनेकदा आपण वस्तू मागवतो. मात्र आवडली नाही की, ती परत पाठवतो. मात्र अशा वस्तू अॅमेझॉन आपल्या एका वेअरहाऊसमध्ये ठेवतं. या वेअरहाऊनमध्ये काही प्रमाणात जुन्या झालेल्या वस्तु देखील ठेवण्यात येतात. त्यांतर या वस्तू अॅमेझॉनच्या सीक्रेट वेबसाईटवर विकल्या जातात.
ग्राहकांकडून परत पाठविलेल्या, काही प्रमाणात वापरून परत केलेल्या आणि ओपन बॉक्स वस्तूंवर अॅमेझॉनकडून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येते. अमेझॉनकडून सीक्रेट वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे आधी परीक्षण करते. त्यानंतरच त्या वस्तूंना ठराविक ग्रेड देऊन विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं. या सीक्रेट वेबसाईटवरही आपल्याला अमेझॉनसारख्याच सुविधा मिळतात. याठिकाणी तुम्हाला 30 दिवसांची रिटर्न पॉलिसी मिळते. विशेष म्हणजे या सीक्रेट वेबसाईटवर तब्बल ४० हजारहून अधिक वस्तू आहे.
एका युजरने त्याचा अनुभव शेअर केला असून त्याला २० हजार रुपयांचं प्रेशर वॉशर विकत घ्यायचं होतं. मात्र त्याने ते अॅमेझॉनच्या वेअरहाऊसवर जावून पाहिलं. त्याला प्रेशर वॉशर केवळ १३ हजार रुपयांमध्ये मिळालं.