एसटी बस व मोटार सायकल यांच्यात अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

राजगुरूनगर: राजगुरूनगर वाडा रस्त्यावर आखरवाडी ता खेड येथील वळणार एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (दि.१७) राजी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अमित नारायण डोंगरे वय 27 रा गंगापूर ता आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाडा मार्गावरून राजगुरूनगर आगाराची एसटी बस क्र एमएच 14 बीटी 1743 वाडा बाजूकडून खेड (राजगुरूनगर)कडे येत होती. तर मयत अमित नारायण डोंगरे वय 27 रा गंगापूर, ता आंबेगाब त्याचा मित्र योगेश मारुती मनकर हे वाडा मार्गे डेहणेकडे जात होते. यावेळी योगेश मनकर दुचाकी चालवीत होता पाठीमागे अमित डोंगरे बसला होता.

आखरवाडी गावाच्या पुढे वळणावर राजगुरूनगरवरून वाडा बाजूकडे जात असताना दुचाकी क्र एमएच 01 एचए 3810 ला एसटीची ठोस बसल्याने दुचाकीवर मागे बसलेला अमित नारायण डोंगरे वय 27 हा एसटी बसच्या मागच्या चाकाखाली पडल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला तर त्याचा मित्र योगेश मारुती मनकर वय 25 रा पारगाव ता आंबेगाव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.खेड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.