लवकरच ‘बाला’ करणार 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रेवश

मुंबई – अभिनेता आयुष्मान कुराणाच्या ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईकडे वाटचाल सुरू केली आहे. 8 नोव्हेंबरला ‘बाला’ चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. ‘कॉमेडी’ आणि ‘ड्रामा’ सोबतच या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना चांगला संदेश देण्यात आला आहे.

देशभरात तीन हजार स्क्रीनवरती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. बाला चित्रपटाने आतापर्यंत तब्ब्ल 82.73 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रेवश करणार आहे.

‘बाला’मध्ये आयुष्मान खुराना केस गळतीनं त्रस्त असलेल्या एका तरुणाच्या भूमिकेत आहे. आयुष्मानच्या अभिनयाची कमाल पुन्हा एकदा या चित्रपटात पाहायला मिळाली आहे. बाला चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे, अशी माहिती आयुष्मान खुरानाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.