चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील चिंबळी परिसरातील कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, चऱ्होली खुर्द येथील शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल म्हणून आरण लावून शेतातच साठवून ठेवला होता.
सध्या कांद्याचे भाव प्रती दहा किलो 80 ते 100 रुपये भाव मिळत आहे. लॉकडाऊन आज ना उद्या उठेल आणि कांद्याला बाजारभाव वाढतील या आशेवर कांदा निवडून वखारीत ठेवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे, अशी माहिती चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.