बारामती (प्रतिनिधी) – कोरानाच्या संकटाचा मुकाबला करतानाच बारामती तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांची गती वाढविण्याबरोबरच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
सुपे येथे सुरू असणाऱ्या विविधकामांची पाहणी रविवारी (दि. 21) पवार यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शासकीय इमारतीशेजारी अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अतिक्रमणे असल्यास हटविण्यात यावीत, असे त्यांनी नमूद केले. कऱ्हाटी येथे शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे वाटपाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जळगाव सुपे-अंजनगाव शिव रस्त्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली.