करोना लसीकरणाचा वेग वाढवा : दत्तात्रय भरणे

सोलापूर  – सोलापूर जिलल्ह्यातील करोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्‍यातील विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करा, असा आदेश सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल.

मंगळवेढा तालुक्‍यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीस नगराध्यक्ष अरुणा माळी, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे व पदाधिकारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, मंगळवेढा मोठा तालुका आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार होणार नाही यासाठी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा. आरोग्य यंत्रणा प्रभावी करण्याबरोबरच स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही मदत घेण्यात यावी. उपचार वेळेत होण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कॉंटेक्‍ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णांच्या पाठीमागे किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या यंत्रणांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.