नगर | जिल्ह्यात 186 नव्या करोनाबाधितांची भर; 171 रुग्णांना डिस्चार्ज

नगर – जिल्ह्यात आज 171 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 73 हजार 282 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.14 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 186 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 15 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 57, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 116 आणि अँटिजेन चाचणीत 13 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 30, नगर ग्रामीण 2, नेवासे 1, पारनेर 1, पाथर्डी 3, संगमनेर 20, अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 37, अकोले 2, जामखेड 1, कर्जत 1, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 3, पारनेर 15, पाथर्डी 3, राहाता 12, राहुरी 1, संगमनेर 28, शेवगाव 2, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 13 जण बाधित आढळून आले. मनपा 3, जामखेड 1, पाथर्डी 1, राहाता 2, राहुरी 4, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, जामखेड 2, कर्जत 1, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 18, पारनेर 13, पाथर्डी 4, राहाता 24, राहुरी 8, संगमनेर 21, शेवगाव 10, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 15, अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्णसंख्या :73282
उपचार सुरू असलेले रुग्ण : 1015
मृत्यू:1140
एकूण रुग्णसंख्या:75437

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.