Ira Khan Post| अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिचे जानेवारी महिन्यात मोठ्या धुमधडाक्यात विवाह सोहळा संपन्न झाला. आयराने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमिर खानच्या मुलीच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
लग्नाच्या 4 महिन्यांनंतर आयराने अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आयरा खानने तिच्या पोस्टमध्ये एकटेपणाची भीती व्यक्त केली आहे. लग्नानंतर एकटेपणा जाणवू लागल्याने चाहतेही चिंता व्यक्त करत आहे आणि तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.
आयरा खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘माझ्या आजूबाजूचे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात पण तरीही मला एकटे राहण्याची भीती सतावत आहे. मला असहाय्य होण्याची भीती वाटते, मला जगातील प्रत्येक वाईट गोष्टीची म्हणजेच हिंसा, रोग, क्रूरतेबाबत भीती वाटते. मला माझ्या आईला गमावण्याची भीती वाटते. माझ्या भीतीवर काहीही उपाय नाही. यानंतर मी एखादे गाणे किंवा चित्रपट पाहते. मला जेव्हा कोणी असं सांगतं की, सर्व काही ठीक आहे, त्यानंतर मला चांगलं वाटतं.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “‘मी विसरते की माझ्यावर खूप प्रेम करणारे लोक आहेत आणि मी हरवले तर मला शोधतील. मला दुखापत झाली तर तो माझी काळजी घेईल. मी एक सक्षम व्यक्ती आहे.” आता तिला अनेकजण विचारत आहे की, जर ती विवाहित आहे तर तिला एकटं का वाटत आहे. याआधी देखील आयरानं एका मुलाखतीत सांगितलं होत की, काही वर्षापूर्वी ती डिप्रेशनमध्ये होती. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. Ira Khan Post|
दरम्यान, आयरा खान आणि नुपूर शिखरेने 3 जानेवारीला नोंदणीकृत विवाह केल्यानंतर 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूरच्या अरवली हिल हॉटेलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केया जोडप्याच्या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरलही झाले होते. आयरा आणि नुपूरचं लग्न प्रचंड चर्चेत होतं. Ira Khan Post|
हेही वाचा: