मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1684 रोजी राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम,लढाया हे आजवर अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळालं आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण नेमकं कस होत हे उलगडून सांगण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव ‘बाल शिवाजी’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत.
View this post on Instagram
‘बाल शिवाजी’ चित्रपटात परश्या अर्थात आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील आकाशच लूक नुकताच समोर आला ज्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाची निर्माती निर्माते संदीप सिंग आणि एव्हीएस स्टुडिओने केली आहे. यामुळे चित्रपट बिग बजेट असणार हे आता निश्चित झालं आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते सोळाव्या वर्षापर्यंतच्या अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. हा चित्रपट जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी शिवरायांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवणार असल्याचे रवी जाधव यावेळी म्हणाले. तसेच गेल्या नऊ वर्षांपासून या चित्रपटाच्या कथेवर काम करत असल्याचे देखील जाधव यांनी यावेळी सांगितले.