Ravi Jadhav On Swatantryaveer Savarkar Movie| अभिनेता रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 22 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. वीर सावरकरांचा संपूर्ण प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.
या चित्रपटाचे कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यांनी कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
रवी जाधवने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट!!! रणदीप हुडाला सलाम! उत्तम अभिनय, छायाचित्रण, संकलन, VFX, पार्श्वसंगीत!!! हजारो अडचणींवर मात करुन रणदीपने जिद्दीने ३ वर्ष मेहनत करुन हा प्रेरणादायी चित्रपट पूर्ण केला. आपण केवळ ३ तास वेळ देऊन तो नक्कीच चित्रपटगृहात पाहून प्रेरणा घेऊ शकतो. सावरकरांना वंदन करु शकतो.’ या पोस्टद्वारे रवी जाधवने चित्रपटाचे कौतुक करत प्रेक्षकांनी चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन केले आहे.
या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने स्वत:ला त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून घेण्यासाठी 26 किलो वजन कमी केले. त्याने कमी वजनातील फोटोही सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले होते, जे व्हायरल झाले होते. विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.