मुंबई – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिले आहे की,’आयुष्यात पुन्हा आनंद मिळावा. तिने एका गूढ माणसासोबतचे स्वतःचे फोट पोस्ट केले आहे. तिने आयुष्यातील बर्याच काळापासून जपलेल्या नातेसंबंधातून बाहेर पडण्याबद्दल लिहिले. आलिया आणि नवाजुद्दीन सध्या घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात असून वेगळे राहत आहेत.
तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, आलियाने एका अज्ञात व्यक्तीसोबतचा स्वतःचा एक आनंदी फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “माझ्या प्रेमाच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला 19 वर्षे लागली आहेत. पण माझ्या आयुष्यात माझी मुलं माझी प्राथमिकता आहेत, आणि नेहमीच होती पुढेही राहतील. दरम्यान, अशी काही नाती आहेत जी मैत्रीपेक्षा मोठी आहेत आणि हे नाते एक आहे आणि मी त्याबद्दल खूप आनंदी आहे.” आलियाने पुढे इंस्टाग्रामवर विचारले, ‘मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का?’ यावर आता कॉमेंट्स येत आहे युजर्स तिला संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
दरम्यान, तिने तिच्या आयुष्याविषयी अपडेट शेअर करताच आलियासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिच्या पोस्टवर कंमेंट्स येत आहे. ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचा अंदाज युजर्स लावत आहे.