मुंबई – आलिया भट्ट ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने फार कमी वेळात नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवली. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केले असून ती एका मुलीची आईही झाली आहे
आलिया तिच्या करिअरमध्ये पूर्णपणे सेटल झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. काही काळापूर्वी आलियाला एका फॅशन ब्रँडची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले. नुकतीच आलिया या फॅशन ब्रँडच्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा तिने तिथे एक भाषण केले, ज्या भाषणानंतर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
गेल्याच दिवशी एका वेबसाइटने आलिया भट्टच्या त्या ब्रँड इव्हेंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया लैंगिक समानतेवर भाषण देताना दिसतय. आलियाने तिच्या भाषणाबद्दल तिला ट्रोल केले आहे. अनेकांना असे वाटते की आलिया नेचुरली स्पीच न देता काही तरी वाचून दाखवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीवर लोकांनी तिला ट्रोल केले. छान पाठांतर केले आलिया पण आत्मविश्वासाची कमतरता आहे.’ तर काहींनी पोपटपंची म्हणून तिला ट्रोल केले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, आलिया भट्टचा चित्रपट रॉकी आणि राणीची प्रेमकथा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रणवीर सिंगही दिसणार आहे.