दुमका – झारखंडमधील डुमका येथे रविवारी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर यामध्ये एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने या परिसराला घेरले असून शोधमोहीम हातात घेतली आहे.
Superintendent of Police, Y S Ramesh : In an encounter with Naxals in Dumka, 1 jawan has lost his life and 4 others are injured. According to our information 4-5 Naxals have been shot. #Jharkhand pic.twitter.com/f5yjENH6zH
— ANI (@ANI) June 2, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील डुमका येथे चकमक झाली. रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाली. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी चार जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला.