15 नायब तहसीलदार, 62 अव्वल कारकूनांसह मंडल अधिकारी
नगर – जिल्हा प्रशासनात सध्या प्रशासकीय बदल्यांची धामधूम सुरु असून जिल्ह्यातील पंधरा नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अव्वल कारकुन, मंडल अधिकारी, लिपिकासह तलाठ्यांसह 229 कर्मचाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पदापासून अव्वल कारकून व लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली अपरिहार्यपणे होत असते. त्यानुसार दोन दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनातील अव्वल कारकूनसह 62 मंडल अधिकारी व लिपिक 18 व 149 तलाठी पदावरील एकूण 244 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
नायब तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या यास शासनस्तरावरून केल्या जात. मात्र, दोन दिवसापूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत नेमलेल्या समितीने नायब तहसीलदार यांच्या बदल्या बाबत मसुदा तयार केला. त्यानुसार जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शुक्रवारी 15 नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार अ. शा. रणदिवे यांची पारनेर तहसील कार्यालयात, द. च. लोखंडे यांची कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालय, संजय माळी यांची पाथर्डी तहसील कार्यालय, माधुरीताई आंधळे यांची जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा, शोभा माळी यांची शेवगाव तहसील कार्यालय, अर्चना भाकड यांची पारनेर तहसील कार्यालय, रमेश ससाणे यांची पाथर्डी उपविभागीय कार्यालय, भा.गो. भांगरे यांची राहाता तहसील कार्यालय, राजू दिवाण यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा, बेबिताई गोसावी यांची अकोले तहसील कार्यालय, माधव गायकवाड यांची नगर तहसील कार्यालय, ज्योती जायकर यांची जामखेड तहसील कार्यालय, अ. श. बारवकर यांची नगर तहसील कार्यालय, संजय परदेशी यांची नेवासा तहसील कार्यालय आणि शि. ला. सुसरे यांची शेवगाव तहसील कार्यालय येथे बदली झाली आहे.