मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर आणि लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. स्वतः हा शबाना आझमी यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जावेद अख्तर शबानाजी आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदनीस जयश्री दिसून येत आहे.
महत्वाचं म्हणजे या फोटोमध्ये त्यांनी जे कपडे परिधान केले आहेत ते कपडे याच महिलेने त्यांना भेट म्हणून दिले आहेत. ते कपडे घालून त्यांनी महिलेसोबत फोटो काढला आणि तो शेअर केला. शबाना यांनी निळा आणि बेंज रंगाची साडी नेसली आहे तर जावेद यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि सोबत निळ्या रंगाचा टॉवेल घेतला आहे.
View this post on Instagram
नुकतंच घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीचं लग्न झालं. आणि त्या लग्नाचा कपड्यांटा आहेर तिनं शबानाजी आणि जावेद अख्तर यांना दिलं. हा फोटो शेअर करत शबाना यांनी लिहिलं, ‘जयश्रीच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि तिने आमच्यासाठी ही खास भेट आणली आहे. हे कपडे आम्ही घातले आहेत ते तिने भेट म्हणून दिले आहेत.’ सध्या सोशलवर त्यांच्या याच साधेपणाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.