बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात 633 जणांच्या तपासणीत 163 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. तालुका पातळीवर एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या मानली जात आहे.
कोरोणाची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंतची ही देशपातळीवरील रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या ठरली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासन निर्धास्त बारामतीकर अशी परिस्थिती बारामतीतसध्या निर्माण झाली आहे.
बारामती शहर व तालुक्यातील दि23 रोजी 633 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. शासकीय व खाजगी प्रयोगशाळेत त्यापैकी 165 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
58 नमुने येणे अद्याप बाकी आहे. शहरात 97 तर ग्रामीण भागात 66 रुग्ण आढळून आले. बारामतीची आत्तापर्यंत रुग्ण संख्या 8524 इतकी झाली आहे.