पुणे – शहरात एकुण ४ हजार ९७० किलो १० लाखांचा बनावट पनीर साठा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेने कारवाई करत जप्त केला आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, यांना खबर मिळाली की, कर्नाटक येथुन बनावट पनीर टेम्पो मधुन पुणे येथे आणले जाते व ते पुणे शहरातील अनेक छोटया-मोठया दुकानात हॉटेल मध्ये दिले जाते. ५ जूलै २०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक इंदलकर व पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा टेम्पो हा वरिष्ठांचे परवानगीने कात्रज चौक पुणे शहर येथे अन्न व औषध प्रशासन कडील अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर व पथक तसेच पंचांसह सापळा रचुन टाटा कंपनीचा टेम्पो हा ताब्यात घेतला होता.
व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी पंचांसह नमुद टेम्पोची पाहणी केली असता त्या बॉक्समध्ये एकुण ४ हजार ९७० किलो लुज पनीर साठा मिळुन आला. सदरचा माल हा अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करुन जप्त केला असुन त्या माला पैकी तपासणी करीता सॅम्पल घेण्यात आले आहेत. सदरचे सॅम्पल हे नॅशनल अॅग्रीकल्चरल अॅन्ड फुड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इंन्स्टीटयुट (Nafari) बाणेर, पुणे येथील लॅबला पाठविले