डोर्लेवाडी : बारामती वालचंदनगर रोडवर सोनगाव हद्दीमध्ये हायवाच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर बारा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सतीश रामदास पवार राहणार आसू ता. फलटण जी. सातारा वय वर्ष 38 हे ठार झाले असून त्यांचा मुलगा आर्यन सतीश पवार (वर्ष 12) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
MH 42 A 08255 असं हायवा गाडीचा नंबर असून डीपी जगताप अँड कंपनी बारामती असे या गाडीवर लिहिण्यात आलेले आहे. दुचाकी नंबर Mh 11 cs 7472 आहे. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना मिळताच त्यांनी पोलीस हवालदार गणेश पवार यांना घटनास्थळी पाठवत पंचनामा करून योग्य ते आदेश दिले.
बारामती वालचंदनगर रोडचे काही दिवसापर्वी काम पूर्ण झाले आहे. यामुळे या रोडवरती वेगाने वाहने वाहत आहेत. या रोडवर अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. या रोडवर गतिरोधक टाकण्याची मागणी सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा संबंधित रोडच्या बांधकाम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहेत.
मात्र जाणीवपूर्वक अधिकारी गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, यामुळेच वारंवार अपघात घडत आहे. याला सर्वस्वी संबंधित बांधकाम अधिकारी आणि या रोडचे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असून त्यांच्यावरच आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनगावचे कुंदन देवकाते, झारगडवाडी चे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.