नेवासा (प्रतिनिधी) – मला जी आवडते त्या माझ्या मैत्रिणीशी का बोलला, याचा जाब विचारात भेंडा येथे एका विद्यार्थ्यास शालेय व शालाबाह्य दहा ते बारा टारगट मुलांकडून भर चौकात जबर मारहाण करण्यात आली.
भेंडा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यामध्ये भेंडा व परिसरातील अनेक गावातील विद्यार्थिनी व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. गुरुवारी (दि.2) शाळेत पेपर संपल्यानंतर देवगाव- रांजणगाव चौकात एका विद्यार्थ्याला शाळेतील काही विद्यार्थी व शाळाबाह्य मुलांकडून मला जी मुलगी आवडते, तिच्यासोबत का बोललास, अशी विचारणा करत जबर मारहाण करण्यात आली.
कॉलेजमधील शंभर ते दीडशे मुले त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा घटना या कॉलेजात कायमच घडत असून, या कॉलेज परिसरात काही शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य टारगट मुलांकडून मुलींच्या छेडछाड करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. हे मुले रस्त्यावरील चौकांमध्ये दररोजच टोळक्या टोळक्याने उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या मुलींना अश्लील भाषेत बोलण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Pune : कसबा विधानसभा निवडणूकीत नवा ट्विस्ट; कुणाल टिळक यांची…
अनेक मुलींनी तर या टारगटांच्या भीतीने शाळा बंद केली आहे. याआधी देखील यातील काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिक्षकांसमोर हाणामाऱ्या केल्याच्या घटना देखील झालेल्या आहेत.
टारगट मुलांच्या बंदोबस्तासाठी बैठक
शाळेमध्ये येणाऱ्या मुलींची छेडछाड होणे, त्याचबरोबर बाहेरगावातील विद्यार्थ्यांना मारहाण होणे ही अतिशय गंभीर बाब आह. माझ्याकडे देखील काही दिवसांपूर्वी याबाबत तक्रारी आल्या होत्या. परंतु सुधारणा होईल, असा आम्ही समज केला होता. परंतु अशा घटना न सुधारता वाढतच चालल्या आहे. लवकरात लवकर शिक्षक-पालक संघाची बैठक घेऊन कठोर निर्णय घेण्यात येईल. टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
– सोपान महापूर (माजी विद्यार्थी व सदस्य शिक्षक पालक संघ)
विशेष म्हणजे एवढा राडा होऊन देखील कोणीही पोलिसात तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नसल्याने पोलीस देखील हतबल आहेत.