पॅरिस – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवर एक खलनायक म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिमा तयार होत आहे. आणि त्यांना याचा मोठा फटका बसत आहे जगात सर्वत्र एक खलनायक म्हणून त्यांचा निषेध केला. जात असतानाच आता पॅरिसमधील जगविख्यात गेविन म्युझियममधून पुतीन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला आहे.
आम्ही या म्युझियममध्ये हिटलरसारख्या हुकूमशहाला जागा दिली नाही. तर पुतीन यांना आम्ही जागा देणार नाही असे म्हणून म्युझियमच्या संचालकांनी पुतीन यांची तुलना हिटलरशी केली आहे. रशियाने यूक्रेन वर हल्ला केल्यानंतर जगात सर्वत्रच पुतीन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे 21 व्या शतकातील हिटलर या शब्दात पुतीन यांना लक्ष्य केले जात आहे. अमेरिका ब्रिटन फ्रान्स जर्मनी सर्वच देशांनी रशियाचा निषेध केला आहे.
सहाजिकच फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये असलेला या जगप्रसिद्ध संग्रहालयातला जगातील प्रमुख नेत्यांच्या मेणाच्या प्रतिमा आहेत त्यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिमा सुद्धा विराजमान होती. पण आता रशिया युक्रेन संघर्षाचा निषेध म्हणून म्युझियमने ही प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला असून ती प्रतिमा हटवण्यात आली आहे.
100 पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असलेला या म्युझिअममध्ये आम्ही हिटलरसारख्या हुकूमशहा ला जागा दिली नाही त्यामुळे 21 व्या शतकातील हुकुमशहा वलादिमिर पुटीन यांच्याही पुतळ्याला या संग्रहालयात जागा असणार नाही अशा स्पष्ट शब्दात म्युझियम ने आपला निषेध नोंदवला आहे.